अहिल्यानगर: पाच गावठी पिस्टल, नऊ जिवंत काडतूसांसह तीन जण ताब्यात
Breaking News | Ahilyanagar Crime: पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच गावठी पिस्तूल आणि नऊ जीवंत काडतूसासह तीन आरोपींना जेरबंद.

श्रीरामपूर: शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून, आज मंगळवारी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच गावठी पिस्तूल आणि नऊ जीवंत काडतूसासह तीन आरोपींना जेरबंद केले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षण किरणकुमार कबाडी व त्यांच्या पथकाने सदरची कारवाई पार पाडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार कबाडी यांना श्रीरामपूरमध्ये गावठी पिस्टल विक्रीसाठी तीन जण हे हरेगाव फाट्यामार्गे येणार असल्याची गुप्त माहीती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हरेगाव फाटा येथे जाऊन सापळा लावला.
काही वेळाने एका पल्सर मोटरसायकल (क्र. एमएच 17 डीजी 5767) हिच्यावर आलेल्या तीन जणांना पथकाने थांबविले. त्यांची झडती घेतली असता पाच गावठी पिस्टल, नऊ जीवंत काडूतसे त्यांच्याकडे मिळून आली. पोलिसांनी त्यांच्याकडून वरील मुद्देमालासह एक पल्सर मोटरसायकल असा सुमारे 4 लाख 9 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच अक्षय उर्फ भावड्या संजय माळी (वय 23, रा- फत्तेपुर, ता-नेवासा), अजय शिवाजी मगर (वय 25, नांदूर शिखरी, ता- नेवासा), योगेश मच्छिंद्र निकम (वय 35, रा- वडगाव गुप्ता, ता- अ. नगर) या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: Three people arrested with five village pistols, nine live cartridges


















































