Home पुणे तीन वर्षापासूनचे प्रेमसंबंध; घरातून विरोध; दोघांनी घेतला टोकाचा निर्णय

तीन वर्षापासूनचे प्रेमसंबंध; घरातून विरोध; दोघांनी घेतला टोकाचा निर्णय

Breaking News | Pune lover Suicide: प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना.

Three-year love affair opposition from home lover Suicide.jpeg

पुणे:  पुण्यात प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर काल (शुक्रवारी, ता,11) समोर आली होती. पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये या प्रेमीयुगुलानी विष खाऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे तीन वर्षापासून प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बहिणीने काल पोलिसात फिर्याद दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल दुपारी फिर्यादी यांनी त्यांच्या 16 वर्षीय बहिणीला क्लाससाठी सोडलं होतं, मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी एका संशयित मुलाचा देखील तपास याप्रकरणात करायला सुरुवात केली. तो मुलगा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र त्याचा मोबाईल फोन बंद होता. खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात 2 मृतदेह मिळून आल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी धाव घेत याबाबतची माहिती वानवडी पोलिसांना कळवली. या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मागील दोन-तीन वर्षापासून प्रेमसंबंधात असलेल्या प्रेमी युगलांनी त्यांच्या प्रेमाला घरातून विरोध झाल्याने खडकवासला बँक वॉटर परिसरात येऊन विष खाऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षरा हिला तिच्या बहिणीने क्लाससाठी 93 अव्हेन्यू या चौकामध्ये सोडले होते. क्लास संपल्यानंतर ती घरी परतली नाही. तिचा परिसरात शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही, त्यामुळे अक्षराच्या बहिणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवरून वानवडी पोलिस ठाण्यामध्येु गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिचा शोध घेण्यासाठी त्यांनी तिच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क केला. संतोष कळसाईत यालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाइल बंद लागला. त्याच्या मूळ गावीही पोलिसांनी संपर्क केला. त्याचा मोबाइल सायंकाळी साडेपाचपासून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी सकाळपासून पोलिस निरीक्षक लोंढे आणि अंमलदार महादेवनगर परिसरात त्या दोघांचा शोध घेत होते. दरम्यान, उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना दोन तरुण मुलामुलींचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांनी ही माहिती तातडीने वानवडी पोलिसांना दिली. त्यावेळी या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली. या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याने व त्याला घरातून विरोध झाल्याने त्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला परिसरात येऊन विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Breaking News: Three-year love affair; opposition from home lover Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here