तरुणाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने उचचले टोकाचा पाऊल
Breaking News | Suicide: एका महाविद्यालयीन तरुणीने बसमधील अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर.
कोल्हापूर: कोल्हापूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीने बसमधील अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यातील किणी येथे घडली आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिसात करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा यासाठी गावात निषेद मोर्चा देखील काढण्यात आला आहे.
हातकणंगले तालुक्यातील किणी येथे अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. संबंधित अल्पवयीन तरुण बसमधून येत असतांना त्रास देत असल्याचा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितले होते. आईने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आई घरात नसतांना आलेल्या तरुणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्येच्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून संबंधित तरुण त्रास देत असावा अशी चर्चा परिसरात आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवलं आहे. पेठवडगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहिली तसेच न्याय मिळवून देण्याची मागणी केली. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.
Breaking News: Tired of the young man’s harassment, the college girl took an extreme step