रुमाल काढायला गेले अन् काही सेकंदात बाप-लेकीला मृत्यूने कवटाळलं
Breaking News | Jalgaon: घरात कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारात वीज प्रवाह उतरल्याने वडील आणि मुलीचा मृत्यू झाला.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घरात कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारात वीज प्रवाह उतरल्याने वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील तासखेडा इथं ही घटना घडली आहे. समाधान कोळी आणि मानवी कोळी असं मृत्यू झालेल्या पिता-पुत्रीचं नाव आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरात त्यांनी कपडे वाळवण्यासाठी तार बांधली होती. घरात कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारात वीज प्रवाह उतरला होता. पण याबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. समाधान कोळी यांचे वडील अशोक कोळी हे तारावरून रूमाल काढण्यासाठी गेले असता विजेच्या फेकल्या जाऊन तार तुटला. त्याच तुटलेल्या ताराला स्पर्श झाल्याने समाधान कोळी यांना विजेचा धक्का लागला.
घरात खेळत असलेली त्यांची मुलगी मानवी हिने वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्न केला पण मानवी हिला ही विजेचा जोरदार धक्का लागला. विजेचा जबर धक्का लागल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. बाप लेकीच्या विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Breaking News: to remove the handkerchief and within seconds, death gripped the father and daughter