अहिल्यानगर: ट्रक पलटी होऊन पेटला; ट्रक जळून खाक
Breaking News | Ahilyanagar: शॉर्ट सर्किटमुळे ट्रकने अचानक पेट घेतला.
देवळाली प्रवरा: पलटी झाल्यानंतर काही वेळातच मालवाहू ट्रकने पेट घेतला. ही घटना नगर – मनमाड महामार्गालगत राहुरी फॅक्टरी ते गुहादरम्यान शेल पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (दि. २९) रात्री घडली. या घटनेत ट्रक जळून खाक झाला.
मालेगावच्या दिशेने जात असलेला मालवाहतूक ट्रक शेल पेट्रोलपंपाजवळ रात्री पलटी झाला. ट्रकचालक जखमी झाल्याने त्यास राहुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर पहाटे ३ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ट्रकने अचानक पेट घेतला. यावेळी पेट्रोलपंपाचे बाळासाहेब लोखंडे तसेच शशी खाडे, भरत गोंधळी, नितीन कोळसे, किरण कोळसे आदींसह परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. त्यानंतर देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे भारत साळुंके, मंजाबापू बर्डे, संतोष अवसरकर यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला.
राहुरी फॅक्टरी ते गुहा दरम्यान असलेल्या नगर-मनमाड राज्य महामार्गावर असणाऱ्या पेट्रोलपंपाजवळ गुरुवार दि. २९ मे रोजी रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान मालवाहतूक ट्रक रस्त्यात पडलेले खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याचा अंदाज न आल्याने उलटला. त्यानंतर काही वेळातच ट्रकने पेट घेतल्याने हा टुक आगीत खाक झाला आहे. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर मनमाड राज्य महामागनि अहिल्यानगर वरून मालेगावच्या दिशेने जात असलेला मालवाहतूक ट्रक पेट्रोल पंपाजवळ रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने उलटला. यामध्ये ट्रकचालक जखमी झाला. त्यास उपस्थित नागरिकांच्या मदतीने राहुरी येथील खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका मधून उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पहाटे तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ट्रकने अचानक पेट घेतला. यावेळी पेट्रोल पंपाचे बाळासाहेब लोखंडे तसेच शशि खाडे, भरत गोंधळी, नितीन कोळसे, किरण कोळसे व परिसरातील नागरीकांनी ट्रक विझविण्यासाठी मदत केली. आग आटोक्यात येत नसल्याने देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अभिशामक दलास पाचारण करण्यात आले. अग्रिशामक दलाचे भारत साळुंके, मंजाबापू बड़े, संतोष अवसरकर यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत मालवाहतूक ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. त्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नगर-मनमाड मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने खड्डे चुकविण्याच्या नादात वाहने अंदाज न आल्याने उलटून अपघाताच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
Breaking News: Truck overturned and caught fire truck burnt to ashes