Breaking News | Akole Crime: अल्पवयीन मुलींच्या बालविवाह प्रकरणी अकोले पोलिसांत दोन वेगवेगळे बालविवाहाचे गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली.

अकोले: तालुक्यातील देवठाण व पिंपळगाव खांड येथे झालेल्या अल्पवयीन मुलींच्या बालविवाह प्रकरणी अकोले पोलिसांत दोन वेगवेगळे बालविवाहाचे गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. पिंपळगाव खांडमधील कातरमाळ येथे ५ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या विवाहाबाबत बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी विनायक नारायण कर्डक यांनी फिर्याद दिली असून आरोपी लक्ष्मण किसन पारधी, यमुना लक्ष्मण पारधी (दोघेही रा. पिंपळगाव खांड, कातरमाळ), ईश्वर तुळशीराम जाधव, चांगुणा ईश्वर जाधव (दोघेही रा. धावशी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचेविरुद्ध गु. र. नं.५४४/२०२५ बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अल्पवयीन मुलगी ही १५ वर्षे ८ महिने वयाची असून मांडव ओहळ (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील आहे. तर मुलगा हा १७ वर्षे १० महिने वयाचा असून तो कातरमाळ पिंपळगाव खांड येथील आहे.
दुसरा बालविवाह देवठाणमधील मेंगाळवाडी येथे ७ नोव्हेंबर, २०२५ झाला. येथील १७ वर्षे २ महिने वयाची अल्पवयीन मुलीचा तालुक्यातीलच कळस खुर्द येथील अल्पवयीन मुलाबरोबर बालविवाह झाल्याची तक्रार महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका एस. सी. भनगडे यांनी दिली. यावरून आरोपी लताबाई सुभाष मेंगाळ, सुभाष लक्ष्मण मेंगाळ, नवरदेव तसेच वसंत लक्ष्मण पथवे, कविता वसंत पथवे यांचे विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी करत आहेत. दरम्यान, कुठे बालविवाह होत असेल तर कळवावे, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिसांनो के ले बालविवाह मुक्त तालुका करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामाजिक. कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी व श्रीनिवास रेणुकदास यांनी केले आहे.
Breaking News: Two child marriages in Akole two cases registered
















































