Home अहिल्यानगर धक्कादायक! सेल्फॉस पावडरच्या वासाने दोन चिमुकल्यांचा मृत्यू

धक्कादायक! सेल्फॉस पावडरच्या वासाने दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar: नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी येथील धरमवस्तीवर बाजरी धान्य टिकवण्यासाठी वापरलेल्या सेल्फॉस पावडरच्या वासाने दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना.

Two toddlers die from selfoss powder smell

पारनेर: नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी येथील धरमवस्तीवर बाजरी धान्य टिकवण्यासाठी वापरलेल्या सेल्फॉस पावडरच्या वासाने दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.29) सकाळी घडली. या घटनेत मृत मुलांची आई सोनाली विठ्ठल धरम (वय 25) यादेखील बेशुद्ध झाल्या आहेत. त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मुलांमध्ये हर्षल विठ्ठल धरम (वय 5 महिने) आणि नैतिक विठ्ठल धरम (वय 5 वर्षे) यांचा समावेश आहे.

मिळालेली माहिती अशी की, शेतकरी विठ्ठल धरम यांनी बाजरीला कीड लागू नये म्हणून गुरुवारी रात्री धान्याच्या पोत्यात सेल्फॉस पावडर ठेवली होती. शुक्रवारपासून या कुटुंबातील दोन्ही मुलांना आणि आईला मळमळ, उलट्या यांसारख्या तक्रारी सुरू झाल्या. रविवारी पहाटे प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन्ही मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी आणि ग्रामस्थांनी रविवारी दुपारी 4:30 वाजता नगर-कल्याण महामार्गावर रास्तारोको केला. त्यानंतर टाकळी ढोकेश्वर येथील कृषी केंद्रासमोर एक तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस निरीक्षक समीर बारवकर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडगळे, साहाय्यक फौजदार गणेश डहाळे, पोलिस कॉन्स्टेबल मच्छिंद्र खेमनर, सागर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देत नातेवाइकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या घटनेने धान्य साठवणुकीसाठी वापरल्या जाणार्‍या रासायनिक पावडरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Breaking News: Two toddlers die from selfoss powder smell

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here