पाच दिवस पुन्हा अवकाळी पाऊस, कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यात यलो अलर्ट?
Breaking News | Rain Update: उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर शनिवार व रविवार असे दोन दिवस पावसाचा अंदाज असतानाच हवामानातील उल्लेखनीय बदलामुळे राज्याच्या काही भागातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.
२८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भवगळता संपूर्ण महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पूर्व मध्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता आहे. येत्या पाच दिवसांत त्याचे उत्तर आणि ईशान्यकडे मार्गक्रमण होऊ शकते. त्यामुळे राज्यात पाऊस होईल.
माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यात यलो अलर्ट?
२५ ऑक्टोबर : नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर
२६ ऑक्टोबर : मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड
२७ ऑक्टोबर : धुळे, मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर
२८ ऑक्टोबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि नांदेड
Breaking News: Unseasonal rain again for five days, yellow alert on which day

















































