संगमनेर नगरपरिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर; अनेकांचा हिरमोड
Breaking News | Sangamner: या सोडतीमुळे नगराध्यक्षपदी महिलाराज येण्यासह १५ महिला नगरसेविका शहराचा कारभार पाहणार.

संगमनेर: येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.८) प्रांताधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. एकूण १५ प्रभागांमध्ये ५० टक्के महिला आरक्षण लागू करण्यात आले आहे. यामुळे जोरदार तयारीत असलेल्या पुरुष उमेदवारांना मोठा धक्का मानला जात आहे. या सोडतीमुळे नगराध्यक्षपदी महिलाराज येण्यासह १५ महिला नगरसेविका शहराचा कारभार पाहणार आहेत.
प्रांताधिकारी अरुण उंडे व प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत प्रक्रिया पार पडली. यावेळी अनेक आजी-माजी नगरसेवक, राजकीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे माजी उपनगराध्यक्ष इसाकखान पठाण व वसीम शेख यांचा प्रभाग ओबीसी वर्गासाठी राखीव ठरल्यामुळे त्यांना आता नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. काँग्रेसचेच आरिफ देशमुख यांचाही प्रभाग ओबीसी राखीव झाल्याने त्यांनाही नवीन ठिकाण शोधावं लागणार आहे. प्रभाग क्रमांक २ व १३ अनुसूचित जातींसाठी राखीव झाले आहेत. एकूण १५ प्रभागांमधून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडले जाणार असून, त्यात १५ महिला नगरसेविका असणार आहे.
प्रभाहनिहाय आरक्षण पुढिल प्रमाणे, प्रभाग १ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग २ (अ) : अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ५ (अ) : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ६ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ७ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) : सर्वसाधारण, प्रभाग ८ (अ): नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब): सर्वसाधारण, प्रभाग ९ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग १० (अ) सर्वसाधारण महिला, (ब) : सर्वसाधारण, प्रभाग ११ (अ): नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) : सर्वसाधारण, प्रभाग १२ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग १३ (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग १४ (अ) : सर्वसाधारण महिला, (ब): सर्वसाधारण, प्रभाग १५ (अ): नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला असे आरक्षण लहान मुलांच्या हस्ते चिठ्या काढून जाहीर करण्यात आले आहे.
Breaking News: Election Ward-wise reservation announced for Sangamner Municipal Council


















































