मित्रांसोबत गणपती विसर्जनाला गेला, नदीत तोल जाऊन वाहून गेला
Breaking News | Solapur: गणपती विसर्जनाच्या आनंदी वातावरणात दुर्दैवी घटना घडले असून कल्लकर्जाळ गावातील एक तरुण नदीत वाहून गेला.

Solapur: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपती विसर्जनाच्या आनंदी वातावरणात दुर्दैवी घटना घडले असून कल्लकर्जाळ गावातील एक तरुण नदीत वाहून गेला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक माहिती अशी की, अनिल रेवप्पा कोळी (वय 18, रा. कल्लकर्जाळ) हा आपल्या मित्रासोबत गावातील गणपती विसर्जनासाठी गेला होता. रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास विसर्जन सुरू असताना अनिलचा पाय घसरला आणि तो नदीच्या पाण्यात पडला. त्या वेळी नदीत मोठा प्रवाह होता. पाण्याचा जोर जास्त असल्याने अनिल वाहून गेला.
घटनेची माहिती गावकऱ्यांनी तात्काळ पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला दिली. माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करत नदीत शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्याप अनिलचा शोध लागलेला नाही. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका तरुणाचा असा दुर्दैवी अंत होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. अनिलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून विसर्जनाचा उत्साह क्षणात शोकमय झाला.
Breaking News: Went for Ganpati immersion with friends, got carried away by the river


















































