Home संगमनेर संगमनेर: विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

संगमनेर: विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

Breaking News | Sangamner: विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू.

Wireman dies of electric shock

संगमनेर : विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी तालुक्यातील वडगाव पान येथे घडली. नितीन विलास वाघ (वय २९, रा. वडगाव पान) असे मयताचे नाव आहे.

नितीन वाघ हे बाह्यस्रोत कर्मचारी म्हणून महावितरण कंपनीकडे कामाला होते. वडगाव पान येथे ते काम करत असताना अचानक विजेचा धक्का लागून खाली पडले. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर गावातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी खासगी रुग्णालयाच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Breaking News: Wireman dies of electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here