Home अहिल्यानगर सोशल मीडियावरच्या मित्राला महिलेने डांबले, मारहाण करत मागितली खंडणी

सोशल मीडियावरच्या मित्राला महिलेने डांबले, मारहाण करत मागितली खंडणी

Breaking News | Ahilyanagar: एका महिलेने साथीदारांना घेऊन पाच लाख रुपयांची मागणी करत डांबून ठेवत मारहाण केल्याची घटना श्रीगोंद्याच्या तरुणाची फिर्याद : ८ जणांविरुद्ध गुन्हा.

Woman arrested, beat up social media friend and demanded ransom

कुडूवाडी : सोशल मीडियावर श्रीगोंदा (अहिल्यानगर) तालुक्यातील तरुणाला मला तुमचा स्वभाव खूप आवडला, तुम्ही मला कुईवाडीत भेटायला या, असे म्हणत एका महिलेने साथीदारांना घेऊन पाच लाख रुपयांची मागणी करत डांबून ठेवत मारहाण केल्याची घटना कुई (ता. माढा) येथे घडली.

याबाबत सोमनाथ सुभाष निंबाळकर (रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी कुडूवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

काळे, कोयल शिंदे, अनोळखी चार कुकण शिंदे, नीलम व्यक्ती आणि एक महिला अशा एकूण आठ आरोपींविरुद्ध (सर्व रा. कुई) शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीस सोशल मीडियावर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर त्या महिलेने व्हिडीओ कॉल करून मैत्री केली. भेटायला बोलावले. ९ सप्टेंबर रोजी फिर्यादी हा एकटा मोटारसायकलवर तिला भेटायला निघाला. रात्री ९ च्या सुमारास कुईवाडीमध्ये आला. त्यानंतर आरोपी महिलेने मोबाइलवर लोकेशन पाठवून सांगितलेल्या ठिकाणी येण्यास सांगितले. सकाळी पोलिस गाडीच्या सायरनचा आवाज आल्याने तरुणांने पोलिसांची मदत घेतली आणि सुटका केली.

हात-पाय बांधून मारहाण

फिर्यादी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक महिला अन् तिची एक मैत्रीण तिथे आली. त्यानंतर तिथे भेटून निघतो, असे म्हणताच अंधारातून तोंडाला रुमाल लावून पाच ते सहा व्यक्ती तेथे आले.

दोघांनी पाठीमागून उचलून फिर्यादीला अनोळखी ठिकाणी पत्राशेडमध्ये नेले. तिथे हात-पाय बांधून डांबून ठेवत, पाच लाख रुपये दे.. नाहीतर तुला खलास करून टाकतो,’ अशी धमकी देत कपडे काढून पट्टयाने मारहाण केली.

Breaking News: Woman arrested, beat up social media friend and demanded ransom

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here