कुणबी प्रमाणपत्रासाठी लाच घेताना महिला जाळ्यात
Breaking News | Ahilyanagar Bribe: जात पडताळणी कार्यालयातील प्रकार, जात पडताळणी समितीतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर, १८ हजारांची नाच महिलेने घेतल्याचे कारवाईत आढळले,
अहिल्यानगर: कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जिल्हा जात पडताळणी समिती अधिकाऱ्यासाठी १८ हजारांची लाच घेताना एका खासगी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ पडकले. उषा मंगेश भिंगारदिवे (वय 33, रा. श्रीनाथ कॉम्प्लेक्स भिस्तबाग चौक, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
तक्रारदार यांनी मुलीच्या पुढील शिक्षणासाठी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येथील जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज दाखल केला होता. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रेही सादर केली होती. परंतु, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते. साई सायबर कॅफेचे मेहत्रे यांनी त्यांची ओळख उपा भिंगारदिवे यांच्याशी करून दिली. या महिलेने कुणबी प्रमाणपत्र मिळवून देते. मात्र त्यासाठी तुम्हाला २० हजार रुपये द्यावे लागतील. जात पडताळणी समितीतील संशोधन अधिकारी तिदमे यांना पैसे दिल्याशिवाय ते पडताळणी प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करत नाहीत, असे महिलेने तक्रारदाराला सांगितले.
जात पडताळणी समितीतील संशोधन अधिकारी तिदमे पैसे घेतल्याशिवाय प्रमाणपत्रावर सही करत नाहीत, अशी माहिती या कारवाईतून समोर आली आहे. यापूर्वीही कुणबी प्रमाणपत्रासाठी पैसे घेतल्याच्या तक्रारी झाल्या असून, या निमित्ताने जात पडताळणी समितीतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
त्यानुसार तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने गुरुवारी पडताळणी केली, महिलेला जात पडताळणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्वतःसाठी १८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून, याप्रकरणी महिलेविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पथकाने केली,
Breaking News: Woman caught taking bribe for Kunbi certificate