Home अहिल्यानगर अहिल्यानगर: रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू.

अहिल्यानगर: रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू.

Breaking News | Ahilyanagar Accident:  रेल्वेच्या धडकेत बेलापूरच्या 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना.

Woman dies in train collision

श्रीरामपूर:  रूळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत बेलापूरच्या 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर येथील तहसीलच्या कामासाठी बेलापूर येथून चार महिला आल्या होत्या. तहसीलकडे जाण्यासाठी त्यांना रेल्वे स्टेशनचा रूळ ओलांडायचा होता. चौघीपैकी तीन महिला रेल्वे स्टेशनवर असलेल्या ब्रिजवरून पलिकडे गेल्या. चौथी महिला जवळचा मार्ग म्हणून थेट रेल्वे रूळावर उतरली.

रूळ ओलांडत असतानाच हुगळी-वाराणसी ही गाडी आली. रेल्वेचा आवाज येताच महिला घाबरली. घाबरल्यामुळे गोंधळून रेल्वे रूळाच्या पलीकडे जाण्या ऐवजी ती सरळ रेल्वेरूळावरून पळू लागली आणि रेल्वेखाली सापडून ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तिघी महिला ब्रिजवरून गेल्यामुळे त्या वाचल्या, जवळच्या मार्गाने जाण्याच्या प्रयत्नात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे.

Breaking News: Woman dies in train collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here