Home संगमनेर संगमनेर:  बनावट कागदपत्रे वापरून महिलेने घातला ३ लाखाला गंडा

संगमनेर:  बनावट कागदपत्रे वापरून महिलेने घातला ३ लाखाला गंडा

Breaking News | Sangamner: बनावट कागदपत्रे वापरून एका महिलेने महिला बचत गटातील सदस्यांच्या नावाने ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Woman duped of Rs 3 lakh using fake documents

संगमनेर: बनावट कागदपत्रे वापरून एका महिलेने महिला बचत गटातील सदस्यांच्या नावाने ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महिला बचत गटांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी, एका महिलेविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फसवणूक झालेली महिला, फरीन खान मोहम्मद शेख, यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. शेख यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिलेने तक्रारदार महिलेच्या नकळत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड मिळवले. त्यानंतर, त्यांची खोटी सही करून आयेशा महिला बचत गट’ आणि ‘जय हिंद महिला बचत गट’ या नावाने बँक ऑफ बडोदा, संगमनेर शाखेतून ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले.

सिबिल स्कोअर तपासताना फसवणूक आली समोर – शेख फरीन यांना आपल्या भावासाठी मोबाईल घेण्यासाठी कर्ज घ्यायचे होते आणि त्यांनी आपला सिबिल स्कोअर तपासला. त्यांचा सिबिल स्कोअर खूप कमी झाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. याबाबत चौकशी करण्यासाठी त्या तातडीने बँक ऑफ बडोदामध्ये गेल्या. बँकेत त्यांना सांगण्यात आले की, एक वर्षापूर्वी घेतलेले ३ लाख रुपयांचे कर्ज थकले असल्यामुळे त्यांचा सिबिल स्कोअर खराब झाला आहे.

हे ऐकून फरीन यांना धक्का बसला आणि त्यांनी बँकेकडे सविस्तर माहिती मागितली. बँकेने दिलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांच्या ओळखपत्रांवर खोट्या सह्या करून हे कर्ज काढल्याचे उघड झाले. फसवणूक करणाऱ्या महिलेने फरीनच्या मोबाईल नंबरशी लिंक नसलेल्या दुसऱ्याच खात्याचा वापर केला, ज्यामुळे त्यांना कर्जाबद्दल कोणताही ओटीपी किंवा मेसेज मिळाला नाही.

बँक कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय- बँकेचे व्यवस्थापक पंकज यांनीही तक्रारदाराची फसवणूक केल्याचे मान्य केले आणि त्यांना याबाबतचे पुरावे दिले. या कर्जाची रक्कम व्याजासह आता ४ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या संपूर्ण प्रकरणात संबंधित महिलेसोबत बँकेतील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय फरीन यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी फसवणुकीचे सर्व पुरावे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे दिले आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी फसवणूक झालेल्या महिलेला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि असे आणखी प्रकार घडले आहेत का, याचीही तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

संबंधित संशयित महिलेवर यापूर्वीही गुन्हा- या प्रकरणातील आरोपी महिला हिच्यावर यापूर्वीही, २०२३ मध्ये एका शिक्षिकेची ५ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. या घटनेमुळे महिला बचत गट आणि इतर महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Breaking News: Woman duped of Rs 3 lakh using fake documents

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here