Home अहिल्यानगर अहिल्यानगर: महिलेचा खून करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेत अर्धवट जाळले

अहिल्यानगर: महिलेचा खून करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेत अर्धवट जाळले

Breaking News | Ahilyanagar Crime: अनोळखी महिलेचा खून करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेत अर्धवट जाळून पसार झालेल्या आरोपीस पोलिसांनी अटक.

Woman murdered, body partially burned to destroy evidence

कोपरगाव : अनोळखी महिलेचा खून करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेत अर्धवट जाळून पसार झालेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबीक वादातुन पतीनेच पत्नीचा गळा दाबुन हत्या केल्याचे तपासात समोर आले. आरोपी पतीस अटक करण्यात आली असुन त्याचा साथीदार मेहुणा पसार झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील डाउच बु, शिवारात उंबरी नाल्याजवळ शुक्रवारी (दि. ८) दुपारी साडेचारच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. अज्ञात व्यक्तीने खून करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने हे कृत्य केले होते. याबाबत चांदेकसारेचे पोलिस पाटील यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी व आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दोन पोलिस पथके तयार केली.

तपास सुरू असताना कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला संजय ऊर्फ बापू हिरामण मोहिते (वय ३७, रा. सोनारवस्ती, धारणगाव) हा बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल होती. संजय मोहिते याचे दोन लग्न झाल्याचे व पहिल्या पत्नीशी कोर्टात वाद सुरू असल्याचे उघड झाले. संजय मोहिते यास पोलिसांनी अटक केली असून गजानन मोहितेचा शोध पोलिस घेत आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक दीपक रोठे, संदीप सोन्ने, पोहेकॉ. बबन तमनर, किशोर जाधव, दीपक रोकडे, गणेश काकडे, यमनाजी सुंचे, प्रवीण घुले, श्रीकांत कुन्हाडे, अशोक शिंदे, इरफान शेख यांनी केली आहे.

सावळीविहीर फाट्यावर अटक

मयत महिलेच्या हातावर राहुल बापू असे गोंदलेले होते. पोलिसांनी संजय मोहितेचा मोबाइल नंबर मिळवून शोध सुरू केला. संजय यास शिर्डी परिसरातील सावळीविहीर फाट्याजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता, त्याने कौटुंबिक वादामुळे पहिली पत्नी वनिता ऊर्फ वर्षा हिरामण हारावत-मोहिते (ह.मु. गुमगाव, जि. नागपूर) हिचा साथीदार मेव्हणा गजानन मोहितेच्या मदतीने डाऊच बु. शिवारातील उंबरी नाल्याजवळ गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेह जाळला आणि तेथून पळ काढल्याचे त्याने सांगितले.

५ दिवसात पोलिसांनी आरोपीला अटक केली. शुक्रवारी (दि. ८) दुपारी साडेचारच्या सुमारास महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. पतीच त्या महिलेचा मारेकरी असल्याचे समोर आले.

Breaking News: Woman murdered, body partially burned to destroy evidence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here