अहिल्यानगर: फोटो व्हायरलची धमकी देत युवतीवर वारंवार अत्याचार
Breaking News | Ahilyanagar: एका 21 वर्षीय युवतीवर ओळखीच्या तरूणाने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस. (abused)
अहिल्यानगर: शहरात एका 21 वर्षीय युवतीवर ओळखीच्या तरूणाने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. फोटो व्हायरल करेन अशी धमकी देत तब्बल तीन वर्षांपासून पीडितेवर शारीरिक संबंध लादल्याचा आरोप सैफ इशाक शेख (रा. मुकुंदनगर, गरीब नवाज मस्जिदजवळ, अहिल्यानगर) याच्यावर करण्यात आला आहे.
पीडित युवतीने यासंदर्भात शनिवारी (23 ऑगस्ट) रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सैफ शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिताने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन 2022 पासून सैफ याने तिचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने शारीरिक संबंधांस भाग पाडत होता. सन 2022 मध्ये मोहरम निमित्ताने आपल्या आजीकडे गेलेल्या फिर्यादीचा सैफने पाठलाग केला. त्यावेळी त्याने मोबाईल नंबर मागून पीडितेला संपर्कात ठेवले. मनमाड रस्त्यावरील एका कॅफेत बोलवून घेत बंद केबिनमध्ये नेऊन कोल्डड्रिंक्स घेण्याचा आग्रह करत जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर पीडितेचे फोटो काढून मी जे सांगेल तेच करावं लागेल अशी धमकी दिली.
तेव्हापासून सैफने वेळोवेळी तिला त्याच कॅफेमध्ये बोलावून, फोटो व्हायरल करण्याच्या भीतीने अत्याचार करत राहिला. तसेच जुलै मध्ये पीडितेला कायनेटीक चौकातील एका लॉजमध्ये नेऊन आजारी अवस्थेतही जबरदस्तीने अत्याचार केला. पीडितेच्या लग्नासाठी स्थळ येत असल्याचे समजताच सैफने नातेवाईकांना जिवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शेवटी पीडिताने पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी सैफ शेख विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.
Breaking News: Woman repeatedly abused, threatening to make photo viral