Home संगमनेर संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून काम सुरू, सद्भावना शांती मोर्चा

संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून काम सुरू, सद्भावना शांती मोर्चा

Breaking News | Sangamner | Satyajit Tambe: संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून काम सुरू, सद्भावना शांती मोर्चा.

Work is underway through remote control to accelerate the development of Sangamner Satyajit Tambe

संगमनेर:  संग्राम महाराज भंडारे यांच्या वक्तव्याचा व धमकीचा निषेध करण्यासाठी आज संगमनेर शहरात सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांचे भाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे  देखील मोर्चात सहभागी झाले होते. तांबे पिता पुत्रांवर पक्षाने कारवाई करत निलंबित केले असतानाही सत्यजित तांबे व सुधीर तांबे थोरात यांचे नातेवाईक असल्याने मोर्चात उपस्थित होते. यावेळी सत्यजित तांबे यांनी हा मोर्चा काँग्रेसचा नसून बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा देखील असल्याचं भाषणातून स्पष्ट करत स्थानिक विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्यावर टीका केलीय. मी देखील विरोधी आमदार नाही असे सत्यजित तांबे म्हणाले.

सत्यजित तांबे

तुम्ही सत्ताधारी आमदार असला तर मी देखील विरोधी आमदार नाही असा सत्यजित तांबे यांनी उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर बाळासाहेब थोरात यांनी देखील तो सर्वांचाच आहे असं वक्तव्य केलं आहे. मात्र, अमोल खताळ यांनी सत्यजित तांबेंवर टीका करत आज तुम्हाला हे सांगण्याची गरज का पडली?  असा सवाल त्यांनी केला.

हा मोर्चा केवळ काँग्रेसचा नाही तर थोरात यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचा असल्याचे सत्यजित तांबे म्हणाले.  एकदा थोरात यांच्यावर शाई फेकली होती. त्या कार्यकर्त्याला साहेबांनी माफ केले होते. ही या तालुक्याची संस्कृती आहे. आमचा पराभव झाला आहे. हे मी मान्य करतो. जनता चुकलेली नाही. आमचीच कुठेतरी चुक झाली आहे हे आज पुन्हा एकदा सांगतो असे तांबे म्हणाले. मी सुद्धा विरोधी आमदार नाही. या तालुक्यातील प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे तांबे म्हणाले.

तालुक्याचा विकास मोडण्यासाठी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून काम सुरू आहे. आपला प्रतिनिधी त्याच्या आहारी गेला आहे असे म्हणत नाव न घेता तांबे यांनी अमोल खताळ आणि विखे पाटील यांच्यावर टीका केली.

बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य

सत्यजित तांबे हा स्वतंत्रच आहे. डॉ.सुधीर तांबेंना देखील सर्व पक्षांनी मदत केली होती. याला देखील सर्वच पक्षाच्या लोकांनी मत दिली त्यामुळे तो सर्वांचाच असल्याचे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

आमदार खताळ यांची टीका

दरम्यान, सत्यजित तांबे यांच्या या वक्तव्याचा शिवसेना विद्यमान सत्ताधारी आमदार अमोल खताळ यांनी समाचार घेत टीका केलीय. हे वक्तव्य का  करावे लागलं हे संगमनेरच्या जनतेने समजून घ्यावं. सत्ताधारी आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. लोकसभेला सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तुम्ही काम केलं आहे. विधानसभेलाही माझ्या विरोधात प्रचार केला आहे. तुम्ही स्वतःला सत्ताधारी समजत असाल तर तुम्हाला शुभेच्छा. पराभव झाल्यामुळे मामा भाच्याला पुढे करुन हे राजकारण करत असल्याचे खताळ म्हणाले.

Breaking News: Work is underway through remote control to accelerate the development of Sangamner Satyajit Tambe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here