Home अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी चार दिवस यलो अलर्ट, दक्षतेचे आवाहन

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी चार दिवस यलो अलर्ट, दक्षतेचे आवाहन

Breaking News | Ahilyanagar Rain Alert: काही भागांत १० ते १२ जून या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

Yellow alert for Ahilyanagar district for four days

अहिल्यानगर : जिल्ह्याच्या काही भागांत १० ते १२ जून या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून १३ व १४ जून रोजी वादळी वारा, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व भागांत १५ जूनला मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. १५ जूननंतरच पावसाची मार्गाक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

विजांच्या गडगडाटासह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करू नये. विजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, विजेची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीजपुरवठा खंडित करून ठेवावीत. ओढा, तलाव, नदी, वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

Breaking News: Yellow alert for Ahilyanagar district for four days

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here