Home संगमनेर संगमनेर: तुम्ही ४० वर्षे काही केले नाही, आता तरी काम करू द्या;...

संगमनेर: तुम्ही ४० वर्षे काही केले नाही, आता तरी काम करू द्या; विखे पाटील यांचा थोरातांवर निशाणा.

Breaking News | Sangamner | Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat:  खऱ्या अर्थाने ४० वर्षानंतर दुष्काळी गावांमध्ये पाणी पोहचले असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला.

You haven't done anything for 40 years, let's work now Radhakrishna Vikhe Patil targets Thorat

संगमनेर: चाळीस वर्षे जनता भोजापूर धरणाच्या पाण्याची वाट बघत होते. भोजापूरच्या लाभक्षेत्रातील गावे वगळावेत यासाठी बाळासाहेब थोरात यांनी पत्र दिले होते.. मात्र त्यांना जाब विचारण्याऐवजी तुम्ही आजपर्यंत त्यांनाच निवडून देत होता. पण खऱ्या अर्थाने ४० वर्षानंतर दुष्काळी गावांमध्ये पाणी पोहचले असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त तीगाव परिसरातील १८ गावांमध्ये तब्बल ४० वर्षांनंतर भोजापूर धरणाच्या चारीद्वारे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. जलपूजनासाठी पोहचलेल्या जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांची बैलगाडीतून मिरवणुक काढून भव्य पुष्पहार घालून नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना मंत्री विखे पाटील यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा दाखला देत निशाणा साधला.

अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांच्या रूपाने झालेले रूपांतर संगमनेर तालुक्याला विकासाची नवी दिशा देणारे ठरणार आहे. चाळीस वर्षे जनता भोजापूर धरणाच्या पाण्याची वाट बघत होते. भोजापूरच्या लाभक्षेत्रातील गावे वगळावेत यासाठी बाळासाहेब थोरात यांनी पत्र दिले होते.. मात्र जाब विचारण्याऐवजी तुम्ही आजपर्यंत त्यांनाच निवडून देत होता. आम्ही लाभक्षेत्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. पाणी आम्हीच आणले आणि कॅनॉल आम्हीच पूर्ण करणार..

जलसंपदा खाते माझ्याकडेच असल्याने तुम्ही चिंता करू नका, कारण मी जे बोलतो ते करतो. अमोल खताळ नवीन आमदार असल्याने त्याच्यावर सातत्याने टीका होत आहे. त्यांनी ४० वर्षे काही केले नाही, आता अमोलला तरी काम करू द्या. संगमनेर मतदार संघातील लोकांना पूर्वी आमदार बघायला मिळत नव्हते. आता अमोल खताळ गावोगावी फिरत आहे, लोकांना भेटताय. पूर्वी संगमनेरमध्ये फक्त क्रेशर वाले आणि वाळू वाले फिरायचे. ठेकेदारांनी गावं वाटून घेतली होती. त्यामुळे आपण आता लोकांमध्ये राहणारा आमदार दिला.

Breaking News: You haven’t done anything for 40 years, let’s work now Radhakrishna Vikhe Patil targets Thorat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here