Home संगमनेर संगमनेर: शेततळ्यात पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

संगमनेर: शेततळ्यात पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

Breaking News | Sangamner: वाजता शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

Young farmer dies after falling into farm pond

संगमनेर: तालुक्यातील वडगाव लांडगा येथील तरुण शेतकर्‍याचा गुरुवारी (दि.24) पहाटे पाच वाजता शेततळ्या बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की सोपान बाळासाहेब लांडगे (वय 29) हा तरुण शेतकरी पहाटे शेततळ्यावर पाहणी करण्यासाठी गेला असता पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यास तत्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचारांपूर्वीच मयत असल्याचे घोषित केले.

याबाबत ज्ञानेश्वर बाळासाहेब लांडगे यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Breaking News: Young farmer dies after falling into farm pond

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here