अहिल्यानगर: लेझीम खेळताना तरुणाचा मृत्यू
Breaking news | Ahilyanagar: जगदंबा देवी मंदिरात उत्सवानिमित्त नवरात्र लेझीम खेळत असताना चक्कर येऊन पडल्याने युवकाचा मृत्यू झाला.
राशीन: येथील जगदंबा देवी मंदिरात उत्सवानिमित्त नवरात्र लेझीम खेळत असताना चक्कर येऊन पडल्याने युवकाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. बबन मल्हारी धोंडे (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे.
येथील सायकर वस्ती येथे राहणारा बबन देवी मंदिरात लेझीम खेळत होता. रात्री लेझीम खेळताना तो चक्कर येऊन पडला. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत राशीन पोलिस चौकीमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Breaking News: Young man dies while playing Lezim