Home महाराष्ट्र प्रेयसीच्या खर्चाला वैतागून तरुणाने संपविले जीवन, प्रेयसीवर गुन्हा

प्रेयसीच्या खर्चाला वैतागून तरुणाने संपविले जीवन, प्रेयसीवर गुन्हा

Breaking News | Suicide CRIME: प्रेयसीकडून सतत होणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. 

Young man ends life after being upset over girlfriend's expenses, crime against girlfriend

मुंबई : प्रेयसीकडून सतत होणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसानी तपास करून आठ महिन्यांनंतर प्रेयसीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मृत तरुण आतिक (२२) (नाव बदलले आहे) गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात आई, वडील आणि बहिणीसह रहात होता. तो बेलापूर येथील खाजगी कंपनीत कामाला लागला होता. आतिकचा पगार २४ हजार रुपये होते. त्याला बोनस वगैरे मिळून ३० हजार रुपयांपर्यंत पगार मिळत होता. सुरवातीला तो घरी पैसे देत होता. मात्र नंतर तो पैसे देईनासा झाला.

मित्राला पैसे देत असल्याची थापपगारातील पैसे का देत नाही, अशी विचारणा कुटुंबियांनी त्याच्याकडे केली होती. मित्राला गरज असल्याने त्याला पैसे देत असल्याची थाप त्याने त्यावेळी मारली होती. मित्र नंतर सर्व पैसे परत करणार आहे, असेही त्याने आईला सांगितले. तो १० जानेवारी २०२५ रोजी घरी आला. त्याने आईकडून डेबिट कार्ड घेतले. त्यातील २५ हजार काढले. त्यानंतर तो घरी आला आणि रात्री त्याने आपल्या खोलीमधील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आतिक तणावात होता याची कुटुंबियांना कल्पना होती. मात्र नेमके काय बिनसले हे त्यांना माहित नव्हते. आतिकची बहिण परवीनने भावाचे इन्स्टाग्राम खाते तपासले. त्यावेळी त्याचे शबनम (२१) नामक तरूणीशी प्रेमसंबंध असल्याचे समजले. शबनम कशाप्रकारे पैशांसाठी त्रास देत होती त्याची माहिती तिला मिळाली. त्या दोघांच्या संभाषणात शबनम आतिककडे पैशांची मागणी करून दबाव टाकत असल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत आतिकच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, जून ते डिसेंबर २०२४ या कालावधीत शबनमने आतिककडून पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या. तिला सोनसाखळी हवी होती. यासाठी आतिकने आपला आयफोन विकला आणि ४० हजार रुपये जमवून दिले होते. सोनसाखळीसाठी त्याने ३ लाख रुपये शबनमला दिले होते. शबनम आजारी असतान तिच्या रुग्णालयाचे ५० हजार रुपयांचे बिलही आतिकने भरले होते.

Breaking News: Young man ends life after being upset over girlfriend’s expenses, crime against girlfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here