Home अहिल्यानगर अहिल्यानगर: तरुणाकडून तरुणीला त्रास, तरुणीने घेतला गळफास

अहिल्यानगर: तरुणाकडून तरुणीला त्रास, तरुणीने घेतला गळफास

Breaking News | Ahilyanagar: १७वर्षीय मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या.

Young man harasses young woman, young woman Suicide

अहिल्यानगर : अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची नगर तालुक्यातील घटना ताजी असतानाच फोनवरून मानसिक त्रास दिल्याने तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ९) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास आत्महत्या नागरदेवळे शिवारात घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ऋषी फुंदे (पूर्ण नाव माहीत नाही, हल्ली रा. पुणे, मूळ रा. सोनानगर, सनी पॅलेस हॉटेलमागे, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.

वैष्णवी गणेश घोरपडे (वय २४, रा. नागरदेवळे, ता. अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आरोपीचे लग्न झालेले आहे. असे असताना तो वैष्णवीला फोन करत असे. त्याने फोनवरून तुझ्या आई-वडिलांना व भावाला मारून टाकीन, अशी धमकी दिली. तसेच शिविगाळ करत फोनवर बोलण्यास भाग पाडून तरुणीला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून वैष्णवी हिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यापूर्वी नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल असून, एकाच आठवड्यात मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.

Breaking News: Young man harasses young woman, young woman Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here