अनैतिक संबंधातून तरुणाने प्रेयसीच्या नवऱ्याचा केला खून, “तुझी बायको आवडते मला, आमच्या दोघांमध्ये…
Breaking News | Satara Crime: अनैतिक संबंधातून एका तरुणाने प्रेयसीच्या नवऱ्यावर जेवणाच्या डब्याने वार करीत कॅनॉलमध्ये ढकलून देत खून केला.
सातारा : अनैतिक संबंधातून एका तरुणाने प्रेयसीच्या नवऱ्यावर जेवणाच्या डब्याने वार करीत कॅनॉलमध्ये ढकलून देत खून केला. ही घटना शिरवळ (ता.खंडाळा) येथील दत्तनगर या निर्मनुष्य असलेल्या नीरा- देवघर कॅनॉलजवळ घडली.
या घटनेतील प्रियकराचा शिरवळ पोलिसांनी १ तासातच पर्दाफाश करीत बेड्या ठोकल्या. यात प्रदीप रामाश्रय सिंग (वय ३१, सध्या रा. दत्तनगर, शिरवळ, ता. खंडाळा. मूळ रा. जिगरसंडी, ता. जहानागंज जि. आजमगढ राज्य उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर, मयत प्रदीप सिंग याचा नातेवाईक असलेला जितेंद्रकुमार राजमन गौतम (वय २०, सध्या रा. दत्तनगर, शिरवळ ता. खंडाळा. मूळ रा. दुर्गोलीकला, बदलापूर, जि. जौनपूर, राज्य उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान घडली होती.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दत्तनगर (शिरवळ) येथील प्रदिप सिंग व जितेंद्रकुमार गौतम हे एकत्र राहत असून प्रदीप सिंग हा चौपाळा येथील एका अपार्टमेंटमध्ये फर्निचरच्या दुकानात कामासाठी आहे. दरम्यान, १९ मे रोजी प्रदिप सिंगने कामावरून सुटल्यानंतर दुकान मालकाची दुचाकी घेत, जितेंद्रकुमार गौतम याच्याबरोबर पंढरपूर फाटा येथील एका वाईन्स शॉपवरून दारू विकत घेतली. दोघांनी प्रदिप सिंग हा ज्या ठिकाणी काम करत होता त्याठिकाणी मद्यप्राशन केले. त्यानंतर दोघेही ९ ते ९.३० च्या दरम्यान घरी जाण्यासाठी निघाले.
शिरवळ येथील दत्तनगर येथील निर्मनुष्य असलेल्या नीरा देवघर कॅनॉलजवळील पायवाटेवर जात असताना, जितेंद्रकुमार गौतम याने प्रदिप सिंग याच्या पत्नीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधावरून वाद घातला. आणि प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याच्या रागातून प्रदिप सिंग याच्या डोक्यात स्टीलच्या डब्याने मारहाण करून नीरा देवघर कॅनॉलमध्ये ढकलून दिले. ढकलून दिल्यानंतर आरोपी जितेंद्रकुमार गौतम हा घटनास्थळी साधारण १५ ते २० मिनिटे थांबून होता. यावेळी जितेंद्रकुमार गौतम याने प्रदिप सिंग याचा व स्वतःचा मोबाईल घटनास्थळापासून काही अंतरावर फोडून देत, राहत असलेल्या ठिकाणी जात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मोबाईल लुटल्याची व मी पळून आल्याची खोटी माहिती नातेवाईकांना सांगितली आणि घटनास्थळी नातेवाइकांसमवेत आला.
महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, शिरवळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव सिद्, नयना कामथे, पोलीस अंमलदार अंकुश गार्डी, सचिन वीर, सुरेश मोरे, अरविंद बा-हाळे, अजित बो-हाटे, मंगेश मोझर, भाऊसाहेब दिघे, विजय शिंदे तसेच सातारा येथील स्थानिक गुन्हे ऍडमिशन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
Breaking News: young man murdered his girlfriend’s husband over an immoral relationship