अहिल्यानगर: तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
Breaking News | Ahilyanagar Crime: बीएससीचे शिक्षण घेणार्या तरुणीने 19 जुलै रोजी, दुपारी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
राहुरी: राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राहत असलेल्या आणि बीएससीचे शिक्षण घेणार्या तरुणीने 19 जुलै रोजी, दुपारी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैष्णवी सचिन म्हसे (वय 23) ही तरुणी राहुरी फॅक्टरी येथील समर्थनगर येथे तिच्या कुटुंबासह राहत होती.
ती बीएससीचे शिक्षण घेत होती. तिने दुपारच्या सुमारास घरात कोणी नसताना घराच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. वैष्णवीची आई दुपारी 1.30 वाजता घरी गेली असता घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ आवाज दिला, मात्र वैष्णवीने दरवाजा उघडला नाही. परिसरातील काही तरुणांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता वैष्णवी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. वैष्णवीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून ताबडतोब राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.
मात्र वैद्यकीय अधिकारी शिरसागर यांनी वैष्णवीला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. वैष्णवीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती. वैष्णवीने कोणत्या कारणाने आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. या बाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहेत.
Breaking News: Young woman commits suicide by hanging