Home अहिल्यानगर अहिल्यानगर: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू,  पाहुणे पाहायला येणार होते...

अहिल्यानगर: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू,  पाहुणे पाहायला येणार होते तेच …

Breaking News | Ahilyanagar Accident: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणीचा अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू.

young woman who went for a morning walk died in a vehicle collision

नेवासा फाटा : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणीचा अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू झाला. सुप्रिया आदिनाथ पवार (वय १९, रा. भानसहिवरे, ता. नेवासा), असे मृत तरुणीचे नाव आहे. शेवगाव रस्त्यावर ‘हॉटेल जयराज’ नजीक शुक्रवारी सकाळी सहा वाजेदरम्यान ही घटना घडली.

भानसहिवरे येथील पवार हिचे सुप्रिया बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. शुक्रवारी तिला पाहुणे पहायला येणार होते. ती यापूर्वी कधीही मॉर्निंग वॉकला गेली नव्हती. मात्र, शुक्रवारी सकाळी ६ वाजता ती नेवासा-शेवगाव रस्त्यावर फिरण्यासाठी गेली होती. घरी परत येताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाची ‘हॉटेल जयराज ‘जवळ तिला जोरात धडक बसली. त्यात ती गंभीर जखमी नातेवाइकांनी तातडीने उपचारार्थ नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणीला मृत घोषित केले. गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे भानसहिवरे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेच्या दिवशीच शुक्रवारी तिला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते. त्याच्या नियोजनाची तयारी घरात सुरू होती. घरात आनंदाचे वातावरण असतानाच सुप्रियाच्या मृत्यूची बातमी आल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Breaking News: young woman who went for a morning walk died in a vehicle collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here