Home Accident News अहिल्यानगर: ‘अवजड वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू’; हायवा डंपरखाली तरुण सापडला

अहिल्यानगर: ‘अवजड वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू’; हायवा डंपरखाली तरुण सापडला

Breaking News | Ahilyanagar Accident: शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या दिल्लीगेट परिसरात खडी, मुरूम वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरखाली सापडून एका तरुणाचा मृत्यू.

Youth dies after being hit by heavy vehicle Youth found under a highway dumper

अहिल्यानगर : शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या दिल्लीगेट परिसरात खडी, मुरूम वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरखाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.१६) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. प्रकाश नाना अवचर (वय ३२, रा. दातरंगे मळा, नालेगाव) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डंपर (एमएच १६ सीसी ८२४४) नेप्ती नाक्याकडून दिल्लीगेटकडे येत असताना दिल्लीगेट वेशीच्या बाहेर असलेल्या शहर बस थांब्याजवळ रस्त्याने पायी चाललेल्या प्रकाश अवचर यास धडक दिली. या धडकेत तो डंपरच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला. त्याच वेळी दिल्लीगेट परिसरात असलेले त्याचे नातेवाईक राजकिरण कुमार पटेकर (रा. गौतमनगर, नीलक्रांती चौक) यांनी त्यास उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मूत घोषित केले. या अपघातानंतर डंपरचालक पसार झाला.

या प्रकरणी राजकिरण पटेकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी डंपरचालक ऋषी बैस (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत प्रकाश अवचर याच्या पश्चात आई, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

Breaking News: Youth dies after being hit by heavy vehicle Youth found under a highway dumper

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here