Home अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये मुसळधार ! ; तरुण कामावरून घरी येत होता अन्.. पुरात

अहिल्यानगरमध्ये मुसळधार ! ; तरुण कामावरून घरी येत होता अन्.. पुरात

Breaking News | Ahilyanagar: मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेल्याने त्याचा मुत्यू झाला.

Youth dies after being swept away in floodwaters caused by heavy rains

नगर: नगर तालुक्यात रविवारी (ता. १४) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाळुंज पारगाव परिसरातील मेंडका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात प्रथमेश साळवे (वय २१) हा तरुण वाहून गेल्याने त्याचा मुत्यू झाला.

ग्रामस्थांनी सायंकाळच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या प्रथमेशचा मृतदेह शोधला असून, उत्तरीय तपासणीसाठी तो जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वांळुज येथील प्रथमेश साळवे हा कामावरून घरी येत असताना वाळुंज पारगाव सीमेवर असणाऱ्या मेंडका नदीवर उभा असताना त्याचा पाय घसरला.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहत गेला. नदीजवळ असणाऱ्या जयराम गायकवाड, संतोष गायकवाड, कुंदन गायकवाड, सुहास गायकवाड, साईनाथ गायकवाड, अंबादास मोहन गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, मेहेर गायकवाड, किशोर गायकवाड, अंकुश गायकवाड, सुनील शेजाळ, सागर पवार, अंतुल गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड या तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर त्याचा शोध लागला. वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याचा मुत्यू झाल्याचे सांगितले.

Breaking News: Youth dies after being swept away in floodwaters caused by heavy rains

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here