अहिल्यानगर: शोषखड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: मोलमजुरी करणाऱ्या तरुणाचा घरगुती शोषखड्ड्यात पडून मृत्यू.
देवळाली प्रवरामधील सोसायटी डेपोनजीक दत्तनगर परिसरात बुधवारी सायंकाळी मोलमजुरी करणाऱ्या तरुणाचा घरगुती शोषखड्ड्यात पडून मृत्यू झाला. जालिंदर ऊर्फ पिंटू अण्णा देशमुख (रा. देवळाली प्रवरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
जालिंदर देशमुख हा मोलमजुरी करणारा तरुण दत्तनगर येथील गायकवाड यांच्या घरासमोर शोषखड्ड्यातील उपसा करत असताना त्यात पडला व त्याचा मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेस पाचारण केले. घटनास्थळी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असता खड्यात पडलेल्या मृत तरुणाला वर काढण्यात आले.
त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, प्रहारचे आप्पासाहेब दूस, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश वाळूज यांनी धाव घेतली. जालिंदर देशमुख याच्या पश्चात आई, पत्नी, मुली असा मोठा परिवार आहे.
Breaking News: Youth dies after falling into sinkhole