Home क्राईम खळबळजनक: महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये १० वीचा गणिताचा पेपर

खळबळजनक: महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये १० वीचा गणिताचा पेपर

10th Maths Paper: सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलमध्ये दहावीचा गणिताचा पेपरचा फोटो आढळून आला. गुन्हा दाखल.

10th Maths Paper in Female Security Guard Mobile

पुणे: बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलमध्ये दहावीचा गणिताचा पेपरचा फोटो आढळून आला. त्यामुळे पेपरफुटीचा हा प्रकार असल्याचा भरारी पथकाला संशय आहे. याबाबत भरारी पथकाचे प्रमुख किसन भुजबळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनिषा संतोष कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील यशंवतराव चव्हाण माध्यामिक विद्यालयात दहावीची परीक्षा सुरु आहे. तेथे महापालिकेच्या सुरक्षा रक्षक मनिषा कांबळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची मुलगीही याच परीक्षा केंद्रात दहावीची परीक्षा देत आहे. भरारी पथकाने बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता या केंद्राला भेट दिली. तेव्हा मनिषा कांबळे या मोबाईलमध्ये काहीतरी करत होत्या. परीक्षा सुरु असताना मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही त्या मोबाईल वापरत असल्याने भरारी पथकाला संशय आला. त्यांनी त्यांचा मोबाईल तपासला असता त्यात १३ मार्च रोजीचा गणित भाग १ या विषयाचा इंग्रजी माध्यमाचा एन ९१३ विषयकोड असलेल्या प्रश्न पत्रिकेचा पान कर ८ / एन ९१३ या पानाचा फोटो काढलेला आढळून आला. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध तसेच १३ मार्च रोजी संबंधित ब्लॉकचे सुपरवायझर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा १९८२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षकांना वर्गामध्ये जाता येत नाही. त्यांनी बाहेर सुरक्षेचे काम करायचे असते. असे असताना त्यांच्याकडे या पेपरचे पान कसे आले. त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा बिबवेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: 10th Maths Paper in Female Security Guard Mobile

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here