१७व्या मजल्यावरून उडी मारून ३५ वर्षीय महिलेची आत्महत्या
Breaking News | Kalyan Crime: धक्कादायक घटना घडली आहे. एका ३५ वर्षीय महिलेने १७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या.
कल्याण: कल्याणच्या योगीधाम परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका ३५ वर्षीय महिलेने १७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. खडकपाडा पोलिसांचा या घटनेचा तपास सुरु आहे. ही महिला लिफ्टमधून १७व्या मजल्यावर जातानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याणच्या योगिधाम परिसरात एका ३५ वर्षीय महिलेने 17 व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना काल (शनिवारी) सायंकाळच्या सुमारास घडली. ही महिला या इमारतीमध्ये राहत नसून ती बाहेरून इमारतीमध्ये आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. ही महिला लिफ्टने १७व्या मजल्यावर जात असतांना सीसीटीव्हीमध्ये कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या घटनेबाबत माहिती देताना योगिधाम फेडरेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी सांगितलं की, दुपारच्या सुमारास मला फोन आला होता. मी इमारतीजवळ येऊन पाहिलं तर एका महिलेने 17 व्या मजल्यावरून उडी मारली होती. नंतर माहिती घेतली असता, ती अनोळखी महिला होती. ती बाहेरून आली होती. ती येथील रहिवासी नाही, अशी माहिती समोर आली आहे.
या कॉम्प्लेक्समध्ये ही महिला बाहेरून आली होती. ती अगदी शांतपणे लिफ्टमधून 17व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. त्यानंतर तिने उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. खडकपाडा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून ही महिला कुठे राहत होती? ती या इमारतीमध्ये का आली? या महिलेने आत्महत्या का केली? याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.
Breaking News: 35-year-old woman commits suicide after flying from the 17th floor