Home अकोले अकोले ब्रेकिंग: अकोले तालुक्यातील ८ स्टोन क्रशर सील

अकोले ब्रेकिंग: अकोले तालुक्यातील ८ स्टोन क्रशर सील

Akole News Crusher Seals:  ८ स्टोन क्रशरची मुदत संपल्याने सील – सतीश थेटे, तहसीलदार. अकोले

स्टोन क्रशर सील crusher Seal

अकोले: तालुक्यातील ११ पैकी ८ स्टोन क्रशर व खाणपट्टाधारकांची खाणपटाची मुदत १७ ऑक्टोबर २०२२ अखेर संपली असुन फक्त ३ खाणपटटे सुरू असल्याची माहिती तहसीलदार सतीश थेटे यांनी दिली. अकोले तालुक्यात एकुण ११ दिर्घ मुदतीचे खाणपटटे असुन ८ खाणपट यांची मुदत संपलेली आहे. १७ ऑक्टोबर २०२२ अखेर फक्त ३ खाणपटटे चालु आहेत. याबाबत महसूल विभागाने प्रशाकीय यंत्रणेसाठी सविस्तर आदेश काढला आहे.

अकोले तालुक्यातील मुदत संपलेले स्टोन क्रशर व खाणपट्टा धारक खालील प्रमाणे –

किसन बबन महाले(बेलापुर),मनोज ज्ञानेश्वर शिंदे (बेलापुर), दत्तात्रय धोंडीबा शेळके (बेलापुर), नामदेव निवृत्ती कुटे (बेलापुर), शरद मनोहर रत्नपारखी (वाशेरे), जगन्नाथ वसंत देशमुख (देवठण), सचिन किसन सदगीर (कोंभाळणे), बाळासाहेब यशवंत आरोटे(जामगाव) असे आठ स्टोन क्रशर व खाणपट्टा धारक आहेत.

महसूल विभागाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या व पर्यावरण विभागाची अनुमती नसलेल्या दगडखाणी बंद करण्याची कार्यवाही करणे. तसेच संबंधित मंडळाधिकारी, तलाठी यांनी खाणपटटयाच्या ठिकाणी समक्ष भेट देऊन संबंधित खाणपटटा, क्रशर सील असल्याची खात्री करावी. त्या ठिकाणी किती ब्रास खडी आणि क्रश सॅन्ड शिल्लक आहे याचा अहवाल सादर करावा. संबंधित मंडळधिकारी अधिकारी, तलाठी यांनी मुख्यालयी राहुन खाणपटटा, क्रशरची वेळोवेळी तपासणी करुन मुदत संपलेल्या खाणपटटयातुन उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वाहतुक पास व इ.टी.पी जनरेट झाल्याशिवाय गौणखनिजाची वाहतुक होणार नाही याची दक्षता घ्यावी. विना परवानगी, विना वाहतुक पास असलेले वाहन, खाणपटटा सिल न केल्याचे आढळुन आल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे महसूल विभागाच्या आदेशात म्हटले आहेत.

अकोले तालुक्यातील अकोले, विरगाव, समशेरपुर ,शेंडी , ब्राम्हणवाडा, राजुर परिसरात गौणखनिज वाहतुक करताना महाखनिज प्रणालीचा वापर करणे, गौण खनिज उत्खनन ,  वाहतुक करणा-या वाहनांना जी पी एस बसविणे बंधनकारक आहे. तसेचं मुदत संपलेले खाणपटटा सील करण्यात आले आहे.  -सतीश थेटे, तहसीलदार. अकोले.

Web Title: 8 Stone Crusher Seals in Akole Taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here