Home अहमदनगर जि.प.तील महिला लिपिक लाचेच्या जाळ्यात, ५ हजारांची मागणी

जि.प.तील महिला लिपिक लाचेच्या जाळ्यात, ५ हजारांची मागणी

Ahmednagar Bribery Case: वैद्यकीय बिलाच्या मंजुरीसाठी केली ५ हजारांची मागणी.

ZP Female clerk in bribery net, demand 5 thousand

अहमदनगर : शिक्षक पत्नीचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील महिला लिपिकाने ५ हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपिकाला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

चंदा चंद्रकांत ढवळे (वय ४५) असे आरोपीचे नाव असून ती प्राथमिक शिक्षण विभागात वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार हे श्रीरामपूर तालुक्यात शिक्षक असून त्यांच्या पत्नी मे व जून २०२१ मध्ये कोरोनाने आजारी असल्याने खासगी दवाखान्यात उपचार घेत होत्या. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. वैद्यकीय बिलाची रक्कम शिक्षकाने नोंदवण्यात आला. स्वतः भरून नंतर हे बिल जिल्हा परिषदेकडे मंजूर होण्यासाठी श्रीरामपूर पंचायत समितीमार्फत जुलै २०२१ मध्ये दाखल केले. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागात हे बिल आल्यानंतर त्याच्या मंजुरीसाठी संबंधित टेबलच्या लिपिक ढवळे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत  विभागात तक्रार केली. त्या अनुषंगाने ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पंच, साक्षीदारासमक्ष जिल्हा परिषदेत लाच मागणी पडताळणी केली असता ढवळे यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी ढवळे हिला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक हरीष खेडकर, निरीक्षक गहिनीनाथ गमे, शरद गोर्डे, हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, विजय गंगूल, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, संध्या म्हस्के, राधा खेमनर, चालक हारूण शेख यांच्या पथकाने केली.

Web Title: ZP Female clerk in bribery net, demand 5 thousand

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here