Home अहमदनगर शिर्डी घटना: तरुणीचे हात पाय बांधून पाच जणांचा सामुहिक अत्याचार

शिर्डी घटना: तरुणीचे हात पाय बांधून पाच जणांचा सामुहिक अत्याचार

Ahmednagar | Shirdi: अनाथालयात राहत असणाऱ्या तरुणीच्या असाहयेतेचा गैरफायदा घेत पाच जणांनी अत्याचार (abused) केल्याची घटना.

The gang rape of five people by tying the hands and feet of the young woman

अहमदनगर: शहरातील एका अनाथालयात राहत असलेली तरूणी रागाच्या भरात शिर्डीला निघून गेली होती. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला. या तरूणीवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री साडेअकरा वाजता सामुहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. येथील एका अनाथालयात राहत असलेली तरूणी 14 जुलै 2022 रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास अनाथालयातून निघून गेली.  त्यानंतर ती शिर्डी मंदिर परिसरात एकटीच राहत होती. दिवाळीचे आगोदर रात्रीचा वेळी शिर्डी येथील अनोळखी पाच मुलांनी रात्रीचे वेळी जेवण देतो, असे सांगून तरूणीला त्यांच्या रूमवर घेऊन गेले.

हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला. पाच ही जणांनी तिच्यावर अत्याचार केला. या तरूणीवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ती शुद्धीवर आल्यावर तिने दिलेल्या जबाबावरून 16 नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच अनोळखी आरोपींच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक पुढील तपास करीत आहेत.

Web Title: The abused of five people by tying the hands and feet of the young woman

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here