Home संगमनेर संगमनेर तालुक्यात पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन यांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू

संगमनेर तालुक्यात पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन यांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू

Sangamner:  शेतातील शेततळ्यामध्ये पाय घसरून पाण्यात पडून बुडून (drowned ) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.

chairman of the credit institution drowned after falling into the farm

संगमनेर: तालुक्यातील चंदनापुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या दिपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन  एकनाथ दगडू राहाणे (वय ७६) यांचे चंदनापुरी येथे आपल्या शेतातील शेततळ्यामध्ये पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी (आपटे मळा) येथे आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता माशांना खाद्य टाकत असताना त्यांचा पाय घसरून ते शेततळ्यात पडले. पाय घसरून पाण्यात बुडाल्याची घटना सकाळी ११.३० वाजता  घडली.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील रहिवासी असणारे एकनाथ दगडू राहणे ह संगमनेर येथे राहावयास होते. ते मंगळवारी आपल्या चंदनापुरी गावाला गेले होते. चार वाजेच्या सुमारास ते आपल्या आपटेमळा येथील असणार्‍या शेततळ्यावर चक्कर मारण्यासाठी गेले होते. रात्र होऊ लागली तरी ते घरी का येईना, म्हणून नातेवाईकांनी आसपास शोध घेतला असता शेततळ्याच्या बाहेर त्यांचा बूट आढळून आला. त्यावरून ते शेततळ्यात पडले असावे, असा संशय नातेवाईकांना आला. शेततळ्यात डोकवले असता त्यांचा बुडालेल्या स्थितीत शेतत ळ्यातील पाण्यात आढळून आला.

Web Title: chairman of the credit institution drowned after falling into the farm

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here