Home संपादकीय हिवरगांव आंबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत सर यांना विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह...

हिवरगांव आंबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत सर यांना विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान

Breaking News | Akole: मार्च (१९९९) माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवार दि.२०/४/२०२४ रोजी सकाळी १०:०० वा. न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव आंबरे येथे पार पडला.

Principal of the school, Bhagwat Sir, was presented with a certificate

हिवरगाव आंबरे: मार्च (१९९९) माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवार दि.२०/४/२०२४ रोजी सकाळी १०:०० वा. न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव आंबरे येथे पार पडला.  ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळ संगमनेर संचालित न्यू इंग्लिश स्कूल हिवरगांव आंबरे विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री पांडुरंग भागवत सर हे ३१/५/२०२४ रोजी  वयोमानानुसार सेवा निवृत्त होत आहे . त्या प्रित्यर्थ सेवा पुर्ती गौरव सोहळा समारंभ आयोजित केला. हिंदी विषयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून काम करताना गेली ३२ वर्ष अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले मुख्याध्यापक म्हणून ३वर्षात स्पर्धा परीक्षा, खेळ, एलिमेंटरी इंटरमिजिएट, एन एम एस, नवोदय मध्ये शाळेच्या यशाचा आलेख उंचावत गेला आदर्श इंग्लिश स्कूल वडगांव लांडगा त्याचप्रमाणे सर्जूनाथ विद्यालय सावरगांव पाट या शाळांमध्ये सुद्धा त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर काम करताना पाहायला मिळतात.

माजी विद्यार्थी व गावाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला गावातील सर्व संस्थाचे अध्यक्ष, सदस्य ,आम्ही हिवरगांवकर मंडळाचे अध्यक्ष सदस्य सर्वच ग्रामस्थ.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव,विद्यालयाचे सर्वृ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी-माजी विद्यार्थी ,आदर्श इंग्लिश स्कूल वडगांव लांडगा , सर्जूनाथ विद्यालय सावरगांव पाट, मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते यावेळी मार्च 1999 च्या माजी विध्यार्थानी सन्मानपत्र देऊन सरांचा गौरव करण्यात आला तर आम्ही हिवरगांवकर मित्र मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले.

सरांनी अखंड हरिनाम सप्ताहची संत पंगतीचे आयोजन केले होते तर मार्च (१९९९ ) विद्यार्थी अनिल रेवगडे ,सुनील रेवगडे, स्वामी रेवगडे ,अंकुश वाकचौरे ,अभय दातीर, दत्तप्रसाद रेवगडे ,गुरुप्रसाद रेवगडे ,देविदास एखंडे, शौकात शेख , रमेश कदम ,संजय आंबरे, संजय रेवगडे, अनिल रेवगडे, बाबासाहेब रेवगडे,योगेश उगले, नवनाथ उगले गोरख कदम, सहदेव कोळगे, देवराम कोळगे, सूर्यभान आंबरे ,राजू एखंडे, प्रमोद रेवगडे व इतर उपस्थित होते सन्मान पत्राचे वाचन श्रीम.गोरे मॅडम व आभार श्री मदने सर यांनी मानले सुत्र संचलन श्री खतोडे सर यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना ज्येष्ठ शिक्षक गुंजाळ सर यांनी केले व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला..!

Web Title: Principal of the school, Bhagwat Sir, was presented with a certificate

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here