Home देव धर्म जगात पंढरीची वारी ही एकमेव वारी, ऐसा नामघोष सांगा कोठे

जगात पंढरीची वारी ही एकमेव वारी, ऐसा नामघोष सांगा कोठे

Ashadi Ekadashi in Marathi: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !!! विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 

Ashadi Ekadashi in Marathi

दंड पाहिले उदंड ऐकीले उदंड वर्णिले क्षेत्रामहिमे । ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देव कोठे। ऐसे संत जन ऐसे हरीचे दास ऐसा नामघोष सांगा कोठे । तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे।।

संत तुकाराम महाराजांनी या शब्दांत पंढरीची महिती गायली आहे आणि त्या पंढरपूर क्षेत्रातील सर्वात मोठा सोहळा म्हणजे आषाढी वारी.

आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गूज पांडुरंग ।। ही देवाची भावना शब्दबद्ध करत असतानाच,

संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा ।। जावे पंढरीसी आवडे मानसी । कधी एकादशी आषाढी ।। आहे आणि त्याला प्रतिसाद म्हणून वारकऱ्यांची भावना सुद्धा संतांनी शब्दबद्ध केली आहे आणि त्याच शुद्ध भावनेने शुद्ध मनाने वारकरी जातात आणि शुद्धमनाच्या वारकऱ्यांची विठ्ठल वाट पाहतो असं संत तुकाराम महाराज सांगतात,

तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे ।। जगात पंढरीची वारी ही एकमेव अशी वारी आहे ज्यात वारीला जाणारे वारकरी संत आणि ज्याच्याकड जात आहे तो भगवत दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेले असतात.

कृपाळू तातडी उतावीळ ।।

आणि याच शुद्ध भावाची ठेवण म्हणजे पंढरीची वारी, ज्यात कसलाच भेद नाही, ना कसली अपेक्षा न कसला विचार न भाग न क्षीण या सगळ्यांच्या पल्याड केवळ आनंद म्हणजे वारी, आनंदची ठेवण म्हणजे वारी, समाजातील विषमता दूर करून समतेवर आधारित आनंदी समाजाचे स्वप्न वारकरी संतांनी पाहिले आणि ते स्वप्न या वारीमधून पूर्ण होते,

सकलासी येथे आहे अधिकार किंवा यारे यारे लहान थोर याती भलत्या नारीनर करावा विचार न लगे चिंता कोणासी ।।

या शब्दांत संतांनी साद घातली हजारो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत आणि गेली दोन वर्ष न झालेला आषाढी वारीचा सोहळा आनंदात पार पडतो आहे, या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना संतांच्या विचारांचा समताधिष्ठित समाज घडावा, स्वातंत्र्य समता बंधुता यांचा मूल्य विचार संतांनी त्यांच्या अभंगातून गायला तोच विचार वाढावा आणि जोपासावा हेच पांडुरंगाच्या चरणी मागणं.

Web Title: Ashadi Ekadashi in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here