Home संपादकीय संगमनेरात राज्यस्तरीय विद्रोही काव्य स्पर्धा २०२४ आयोजित, सहभागाचे आवाहन

संगमनेरात राज्यस्तरीय विद्रोही काव्य स्पर्धा २०२४ आयोजित, सहभागाचे आवाहन

Sangamner News: संगमनेर तालुक्यात राज्यस्तरीय विद्रोही काव्य स्पर्धा २०२४ विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र शाखा-संगमनेर (जि.अहमदनगर) आयोजित

State level rebel poetry competition 2024 organized at Sangamner

संगमनेर: संगमनेर तालुक्यात राज्यस्तरीय विद्रोही काव्य स्पर्धा २०२४ विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र शाखा-संगमनेर (जि.अहमदनगर) आयोजित करण्यात आली आहे. या संस्थेकडून विद्यार्थी विद्यार्थिनीन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माणसाला जगण्यासाठी योग्य जगाच्या शोधात असणाऱ्या सर्व संवेदनशील बंधु आणि भगिनींना विद्रोही सांस्कृतिक चळवळ ता. संगमनेरच्या वतीने विद्रोही काव्य स्पर्धा संयोजन समितीद्वारे सस्नेह निमंत्रण देत आहोत. संगमनेर तालुक्यात प्रथमच विद्रोही काव्य स्पर्धेचे आयोजन होत आहे. माणसाच्या निर्मितीपासून स्वजातीतील शोषक-दमनकारी प्रवृत्तींशी त्याचा सतत संघर्ष सुरु आहे. आपल्या शोषणाच्या कारणांचा शोध घेणारे महामानव विविध काळात निर्माण झाले. ज्यांनी शोषणकारी व्यवस्थेला प्रश्न केला, या व्यवस्थेला नकार दिला, त्यांच्या चिंतन व कृतीतून जे अवतरले तो म्हणजे ‘विद्रोह’… अविचारी झुंडीला विचारी मानवांत बदलून माणसाला जगण्यास योग्य जग निर्माण करणे म्हणजे ‘विद्रोह’… महापुरुषांनी मांडलेल्या या विद्रोही तत्वज्ञानाला शोषितांपर्यंत पोहचवतो. तो विद्रोही कवी… ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ जगाचे स्वप्न पहातो तो विद्रोही कवी… व जो स्वतःलाच आतून बदलतो तो विद्रोही कवी. अशा कवीचे विद्रोही काव्य शोषितांच्या मनांची मशागत करत असते. असे विद्रोही काव्य ऐकणे म्हणजे नव्या जगाची पहाट मनात उजाडणे.. अशा नव्या जगाचे स्वप्न पेरणाऱ्या विद्रोही काव्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण सहपरिवार आमंत्रित असल्याने सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र शाखा-संगमनेर (जि.अहमदनगर)

प्रथम पारितोषिक: ५००१, द्वितीय पारितोषिक ३५०० तृतीय पारितोषिक ३०००, चतुर्थ पारितोषिक २५०० रुपये व सोबत स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच पहिले १० उत्तेजनार्थ १००० रुपये देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम व अटी:

१.     स्पर्धेच्या सहभागासाठी प्रवेश शुल्क रु.१००/- आहे.

२.     कविता सदर करण्यासाठी २+१=३ मिनिटे वेळेची मर्यादा आहे.

३.     स्पर्धकाने स्पर्धेसाठी फक्त १ कविता 9423793813 / 9921772483/9011284503 या व्हाटसअप क्रमांकावर किंवा गुगल फॉर्म किंवा vidrohikavya2024@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावी.

४.     कवितेची निवड झाल्याबाबतचा मेसेज स्पर्धकास आल्यानंतर संबंधित स्पर्धेकाने QR कोडवर प्रवेश शुल्क पाठवावे व तसा स्वतःच्या नावाचा मेसेज विद्रोही काव्य स्पर्धा २०२४ या संबोधनाने 9423793813 / 9921772483 / 9011284503 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा.

५.     स्पर्धकांना दिलेल्या क्रमांकानुसार कविता सादर करावी लागेल. त्या क्रमवारीत बदल केला जाणार नाही.

६.     स्पर्धकांना जाण्या-येण्याचा प्रवास खर्च आणि निवास खर्च स्वतः करावा लागेल.

७.     विद्रोही कविता स्वरचित, कोणत्याही मराठी बोलीभाषेत असावी व कविता स्वता:ची असल्याची हमीपत्र स्पर्धकाने देणे बंधनकारक आहे.

८.     कविता पाठविण्याची अंतिम मुदत ३१ डिसेबर २०२३ पर्यंत राहील.

९.     कविता निवडीची निवड समितीचा व निवडलेली कविता बक्षिसपात्र ठरविण्याचा परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

१०.    ही स्पर्धा सर्व धर्म, जाती, लिंग व वयोगटासाठी खुली आहे.

११.    स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ होईल.

प्रवेशिका पाठविण्याची लिक :

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdLUlsvymqVMyF2vHs6YZVVLYLz5lE6wJ4NKv4V6crBIvSZ_g/viewform?usp=sf_link

स्थळ वेळ: रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता श्रमिक मंगल कार्यालय, अकोले बायपास रोड, संगमनेर या ठिकाणी होईल याची नोंद घ्यावी.

प्रमुख उपस्थिती: मा. धनाजी गुरव, अध्यक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र.

निमंत्रक: प्रा. डॉ. संदीप तपासे, अजीझ भाई ओहरा, संदीपभाऊ मोकळ, जावेदभाई शेख, संजय भालेराव, रवी पवार, एल.एस. आव्हाड, विशाल पगारे, तानाजी सावळे, अध्यक्ष रामदास भालेराव, उपाध्यक्ष: राजेंद्र मुन्तोडे, महासचिव: एकनाथ मेढे, भारतीय बौद्ध महासभा ता. संगमनेर.

संयोजन समिती: संजय कुमार शिंदे, प्रा. शरद तुपविहीरे, कारभारी देव्हारे, असिफभाई शेख, मनीषा पटेकर,विजय पवार, प्रा. सुशांत सातपुते, प्रा. अनिल मुन्तोडे, मनोज भालेराव, विजय घोसाळे, अनुराधा आहेर, विनय घोसाळे, डॉ. अनंत केदारे, बापू चंदनशिवे, बी.डी. पारखे, विश्वनाथ आव्हाड, गौतम मिसाळ, रमेश शिंदे, दिलीपराव बर्डे

आपले विनीत: अरविंद गाडेकर(कार्याध्यक्ष), चंद्रकांत पवार (अध्यक्ष), श्रीकांत माघाडे सचिव

Web Title: State level rebel poetry competition 2024 organized at Sangamner

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here