Home अहमदनगर अहमदनगर खळबळजनक: बसस्थानकात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

अहमदनगर खळबळजनक: बसस्थानकात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

Ahmednagar | Shrirampur News:  श्रीरामपूर बसस्थानकात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह ( Dead body ) आढळल्याने खळबळ.

Dead body of an unidentified man was found at the bus stand

श्रीरामपूर: श्रीरामपूर बस स्थानकाच्या परिसरात एका अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काल दुपारी  बस स्थानकाच्या आवारात एक अनोळखी व्यक्ती निपचित पडलेली दिसून आली. याबाबतची माहिती श्रीरामपूर आगारात देण्यात आली.

स्थानकातील अधिकार्‍यानी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता 30 ते 40 वयोगटातील पुरुष जातीची व्यक्ती मृत स्थितीत असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने अनोळखी मृत व्यक्तीस रुग्णालयात नेले.

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदरच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरिक्षक समाधान सुरवाडे यांनी केले आहे.

Web Title: Dead body of an unidentified man was found at the bus stand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here