अहमदनगर: अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून अत्याचार
Ahmednagar Minor girl sexually abused: धमकी देत वारंवार अल्पवयीन मुलीवर अत्याचार.
अहमदनगर: मोलमजुरी करणाऱ्या एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Sexually abused) केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद सदानंद डहाळे रा. बोल्हेगाव असे आरोपीचे नाव आहे.
अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी प्रसाद सदानंद डहाळे (रा. बोल्हेगाव) याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास मी तुला व तुझ्या आईला ठार मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे मुलीने भीतीपोटी घरच्यांना ही घटना सांगितले नाही. त्यामुळे आरोपी प्रसाद डहाळे याने वारंवार अत्याचार करण्यास सुरुवात केली.
या प्रकाराला बंद करण्यासाठी एका दिवशी मुलीने ही घटना आईला सांगितली. या मुलीच्या कुटुंब मुलाच्या घरी जाऊन जाब विचारायला गेले असता, त्यांनी मुलीच्या घरच्यांना धमकावले. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात प्रसाद डहाळे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Minor girl sexually abused