Home संगमनेर Accident | संगमनेर: ट्रकवरून पडल्याने चालकाचा मृत्यू

Accident | संगमनेर: ट्रकवरून पडल्याने चालकाचा मृत्यू

Sangamner Accident News:  ताडपत्री बांधण्यासाठी ट्रकवर चढले असता पाय सटकला व रस्त्यावर पडले डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू.

Accident driver died after falling from the truck

Sangamner | संगमनेर : पाऊस येत असल्याने ट्रकची सुटलेली ताडपत्री बांधण्यासाठी ट्रकवर चढलेल्या ट्रक चालकाचा पाय घसरल्याने तो रस्त्यावर खाली पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ८ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

नवनाथ रामभाऊ भागवत (वय ३४ रा. नांदूर खंदरमाळ, ता. मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नांदूर खंदरमाळ या ठिकाणी राहणारे नवनाथ भागवत हे शुक्रवारी सायंकाळी एकोणीस मैल या ठिकाणाहून जात सात वाजेच्या सुमारास ट्रक घेऊन एकोणीस मैल या ठिकाणाहून जात होते. पाऊस जास्त असल्याने ट्रकची ताडपत्री सुटली. ती ताडपत्री बांधण्यासाठी भागवत हे ट्रकवर चढले असता त्याच वेळी त्यांचा पाय सटकला व ते रस्त्यावर पडले डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Accident driver died after falling from the truck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here