Home अकोले अकोले ब्रेकिंग: बी. जे देशमुख, दशरथ सावंत, बाजीराव दराडे यांचा पिचड यांना...

अकोले ब्रेकिंग: बी. जे देशमुख, दशरथ सावंत, बाजीराव दराडे यांचा पिचड यांना पाठींबा

Akole karkhana Election | अगस्ती साखर कारखाना अकोले:  समोरच्या पॅनलमध्ये पारंपारिक चालत आलेली तीच तीच माणसे दिसत आहे – बी. जे देशमुख.

Agasti Karkhana election Support

Akole | अकोले: कारखाना वाचविण्यासाठी सर्वांनी पिचड साहेबांना मतदान करावे. कारखान्यातून मिळविलेल्या संपतीतून समोरच्या लोकांकडून मेळावे सुरु आहे. भविष्यात कारखाना सावरायला गायकारांपेक्षा माजी मंत्री पिचड सक्षम असल्याचे मत बी. जे. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.  बी. जे देशमुख, दशरथ सावंत, बाजीराव दराडे यांचा पिचड यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

पिचड साहेबांनी २५ वर्ष कारखाना चालविला. कारखान्यावर ५५ कोटी पर्यंतच कर्ज दिसत होतं. पिचड साहेबांच्या आजारपणामुळे पाच सहा वर्ष दुर्लक्ष झाली त्यामुळे समोरच्या लोकांनी फायदा घेतला. समोरच्या पॅनलमध्ये पारंपारिक चालत आलेली तीच तीच माणसे दिसत आहे. दुसऱ्या बाजूला पिचड साहेबांनी काही नवे चेहरे घेऊन त्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याचा मानस व्यक्त केला. आणि त्या बाबींवर सविस्तर चर्चा झाल्यावर दोन पर्यायांपैकी हा पर्याय आणि पिचड साहेबांच्या नेतृत्वातील माणसे चांगली वाटतात. दगडापेक्षा वीट मउ असल्याने या विचारातून आम्ही एकत्र आलो. कारखाना सावरण्यासाठी पिचड साहेबांनी वास्तव स्थिती मांडल्याने आम्ही एकत्रित आलो आहोत. कारखाना सुधारण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे असे मत बी. जे. देशमुख यांनी व्यक्त केली.  

Web Title:  Agasti karkhana Election B. J Deshmukh, Dashrath Sawant, Bajirao Darade’s support to Pichad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here