Home अकोले माझा संचालक गारवा नव्हे तर शेतकर्‍याच्या बांधावर- माजी मंत्री पिचड

माझा संचालक गारवा नव्हे तर शेतकर्‍याच्या बांधावर- माजी मंत्री पिचड

Akole Agasti Sugar karakhana:  अगस्ति कारखान्याच्या निवडणुकीतील शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराचा नारळ अगस्ती आश्रम येथे वाढविण्यात आला.

Agasti Karkhana election garava

Akole: अकोले: अगस्ति कारखान्याच्या निवडणुकीतील शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी अगस्ती आश्रम येथे वाढविण्यात आला. यावेळी माजी मंत्री पिचड यांनी माझा संचालक ‘गारवा’ नव्हे तर शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन ऊस वाढीचा कार्यक्रम हाती घेईल, असा टोला त्यांनी लगावला.

देशात व राज्यात आमचे सरकार आहे. उगीच जिल्हा बँकेचे गाजर दाखवून शेतकर्‍यांची दिशाभूल करू नका, असा इशारा देतांनाच मी व माझे संचालक अगस्ति कारखाना पुर्वी पेक्षा उर्जितावस्थेला आणू अशी ग्वाही माजी मंत्री व अगस्ति कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी दिली. माझे बरोबर असणारे जे मला सोडून गेले त्यांना कोणत्याही परिस्थितीत जवळ करणार नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

अगस्ति कारखान्याच्या निवडणुकीतील शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी अगस्ती आश्रम येथे वाढविण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री पिचड बोलत होते. शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष गिरजाजी जाधव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

याप्रसंगी माजी मंत्री पिचड यांनी शेतकर्‍यांना भावनिक आवाहन करत जे माझ्यासोबत होते ते गेले, त्यांना परत जवळ करणार नाही, माझ्यासोबत तरुण प्रामाणिक संचालक असून ते चांगले काम करतील असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Agasti Karkhana election garava Speech

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here