Home अहमदनगर संगमनेर: भीषण अपघात; कंटेनरची दुचाकीला धडक, तीन तरुणांचा मृत्यू

संगमनेर: भीषण अपघात; कंटेनरची दुचाकीला धडक, तीन तरुणांचा मृत्यू

Breaking News | Sangamner Accident: भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारादरम्यान सकाळी मृत्यू.

accident Container collides with two-wheeler, three youths die

संगमनेर:  भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील नांदूर शिंगोटे – लोणी रस्त्यावरील नीमोन गावाजवळ घडली. हा अपघात २० एप्रिलला सायंकाळच्या सुमारास घडला.

संगमनेर तालुक्यातील निमोण गावाजवळ घडला. सदरच्या अपघातामध्ये नांदुर- शिंगोटे येथील आदिवासी कुटुंबातील कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय ३०), व युवराज धोंडीबा मेंगाळ (वय २९) व संदीप सोमनाथ आगविले (रा, गर्दनी, ता. अकोले) हे तिघे मोटरसायकलने जात होते. याच वेळी कंटेनरने मोटारसायकलला धडक दिली. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकल वरील तिघेही फेकले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा आज सकाळी उपचारादरम्यान  मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच नांदुर-शिंगोटे येथील ग्रामस्थांनी धाव घेऊन तिघांना रुग्णालयात दाखल केले. परंतु यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आदिवासी पाड्यातील हे तिघेही तरुण ठार झाल्यामुळे आदिवासी बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातस्थळी असलेला कंटेनर ताब्यात घेतला व गुन्ह्याची माहिती घेऊन पंचनामा करण्यात आला.

Web Title: accident Container collides with two-wheeler, three youths die

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here