Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! युवकाचा कालव्यात बुडून मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग! युवकाचा कालव्यात बुडून मृत्यू

Breaking News | Ahmednagar: जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर कामावरून पाणी प्यायला गेला असता, कालव्यात बुडून मृत्यू.

Youth drowned in canal

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील युवकाचा कांबी येथे जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर कामावरून पाणी प्यायला गेला असता, कालव्यात बुडून मृत्यू झाला.

अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे. सदरील घटना शनिवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास घडली. संबंधित युवकाचा मृतदेह कालव्यात शोधत असताना दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.२१) दुपारी मालेगाव शिवारात आढळून आला.

हातगाव येथील युवक अण्णा लक्ष्मण गायकवाड हा शनिवारी कामासाठी गावाशेजारील कांबी येथे गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास नजीकच्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर तो पाणी पिण्यासाठी गेला. त्यावेळी पाय घसरून तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. सोबतच्या मजुरांना समजताच त्यांनी त्याची शोधाशोध केली. परंतु, अण्णा गायकवाड सापडला नाही. घटनेची माहिती मिळताच हातगावसह कांबी येथील ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. परंतु, तरीही शनिवारी

उशिरापर्यंत तो सापडला नाही. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान मालेगाव शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव रुग्णालयात पाठविला. मृत युवकाच्या पश्चात पत्नी, तीन महिन्यांची एक मुलगी व दोन वर्षांचा एक मुलगा आहे. अण्णा व त्याची पत्नी शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. सदरील घटनेची हातगावचे सरपंच अरुण मातंग यांनी तहसीलदारांना माहिती कळवून संबंधित गरीब कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Youth drowned in canal

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here