Home अहमदनगर अहमदनगर: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला अत्याचार

अहमदनगर: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला अत्याचार

Breaking News | Ahmednagar: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अडीच वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

abused by threatening to spread obscene photos

कोपरगाव : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अडीच वर्षे अत्याचार करणाऱ्या इसमाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव शहरात ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी महिलेने सुनील अर्जुन देवकर (रा. टाकळी, ता. कोपरगाव) याच्याकडून पाच लाख रुपये उसने घेतले होते. त्याचा गैरफायदा सुनील घेत होता. त्याने पार्लरमध्ये छुपा कॅमेरा बसवून महिलेचे अश्लील फोटो काढले.

हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ऑगस्ट २०२२ पासून तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. पार्लरमध्ये, नाशिक रोडवरील लॉजवर तसेच कोपरगाव येथील सुनील अर्जुन देवकरच्या ऑफिसमध्ये, अशा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. त्यास महिलेने विरोध केला तेव्हा सुनील देवकर याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली.

या सर्व गोष्टीला कंटाळून संबंधित महिलेने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात २० एप्रिल रोजी रात्री फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सुनील अर्जुन देवकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.

Web Title: abused by threatening to spread obscene photos

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here