Home संगमनेर संगमनेर:  चोरीचा प्रयत्न फसला; एकाला रंगेहाथ पकडले

संगमनेर:  चोरीचा प्रयत्न फसला; एकाला रंगेहाथ पकडले

Breaking News | Sangamner Crime: एका व्यावसायिकाच्या इमारतीवरील छतावर तिघेजण चोरी करण्याच्या उद्देशाने सामानाची उचकापाचक करत असताना रंगेहाथ पकडले.

attempted theft failed One was caught red-handed

संगमनेर: शहरातील आदर्शनगर येथील एका व्यावसायिकाच्या इमारतीवरील छतावर तिघेजण चोरी करण्याच्या उद्देशाने सामानाची उचकापाचक करत असताना रंगेहाथ पकडले. त्यातील एकाला पकडले, मात्र दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर घटना रविवार दि. २१ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास घडली. आदर्श नगर येथील व्यावसायिक तिलक कल्पेश गांधी यांच्या इमारतीच्या छतावर चोरी करण्याच्या उद्देशाने गणेश राजू जेडगुले (वय २६, रा. मालदाड, ता. संगमनेर), सिद्धार्थ दीपक मावस व प्रशांत दीपक मावस (दोघेही रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) हे तिघे सामानाची उचकापाचक करत होते. त्यांना गांधी यांनी आवाज दिला असता जेडगुले याला पकडले, मात्र दोघे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी तिलक गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: attempted theft failed One was caught red-handed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here