Rajesh Tope: मंदिरांबाबाबत सरकारची भूमिका राजेश टोपे यांनी केली स्पष्ट

जालना: महाविकास आघाडीविरुद्ध भाजपाने मंदिरे खुली करण्यासाठी राज्यभर घंटानाद आंदोलन केले यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चांगलेच सुनावलं आहे. त्यांनी मंदिरांबाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यातील मंदिरे, प्रार्थना स्थळे अचानक मोठ्या प्रमाणात सुरु केली तर करोना रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढली तर बेडस उपलब्ध झाले नाही मग रुग्णांना कोठे ठेवायचे असा प्रश्न उपस्थित होतो. मंदिरे खुली केली जातील पण ती योग्य वेळेस निर्णय घेण्यात येईल असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी अंबड येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.
भाजपाने जे आंदोलन केले आहे ते केवळ राजकारण हेतू आहे, त्यांनी अशा प्रकारचे राजकारण करू नये. मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने निर्णय घेत आहेत, त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
मंदिरे बंद रहावीत असे कोणालाच वाटत नाही. सर्व धार्मिक स्थळे सुरु झाली पाहिजे, परंतु हि प्रक्रिया टप्प्याटप्याने व्हावी अशी मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांच्या इच्छेचा आदर केला पाहिजे असे राजेश टोपे यांनी म्हंटले आहे.
Web Title: Rajesh Tope clarified the role of the government regarding temples
















































