Home अहमदनगर शेतकऱ्यांना दिलासा: कांद्याचे भाव वाढले, कांद्याची मागणी वाढली

शेतकऱ्यांना दिलासा: कांद्याचे भाव वाढले, कांद्याची मागणी वाढली

Ahmednagar Onion prices rise

अहमदनगर | Ahmednagar: लॉकडाऊन काळात कांद्याचे भाव अगदी ५०० रुपयांच्या खाली ढासळले होते. आता ऑगस्ट अखेरीस पुन्हा एकदा कांद्याने उसळी मारली आहे. मागील दोन आठवड्यांपासून कांद्याचे दर सातत्याने वाढत आहे. शनिवारी झालेल्या लिलावात नगर बाजार समितीत कांद्याला दोन हजार रुपयांचा बाजार भाव मिळाला आहे.

लॉकडाऊन असताना कांद्याचे भाव चांगलेच उतरले होते. या काळात कांद्याला ५०० रुपये भाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. बऱ्याच दिवस बाजार समित्यासुधा बंद होत्या. पावसाळ्यात कांदा खराब होऊ लागला. १५ ऑगस्ट पर्यंत ५०० ते ६०० रुपये भाव होता. मात्र १७ ऑगस्ट नंतर कांद्याचे भाव हे वधारत जात आता २००० पार झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाची बाब निर्माण झाली आहे. आत वाहतुकीसह सर्व सुविधा सुरु झाल्याने कांद्याची मागणी वाढून परिणामी बाजारभाव वाढले आहे.  

Website Title: Ahmednagar Onion prices rise

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here